Showing posts with label Aniruddha Bapu. Show all posts
परीक्षा संपली कि दिवसभर काय करायचे ह्याचा प्रश्न !ह्या वर उपाय आम्हा दोघी माई-लेकीनी असा काढला कि रोज एक नवीन प्रोजेक्ट बनवायचा. तो संपला कि दुसरा. तर आमचा पहिला प्रोजेक्ट वाल पेन्टींग! घरा बाहेर जो व्हरांडा आहे त्याला डेकोरेट करायचा. हा आमचा प्रोजेक्ट संपायला आला आहे. त्याचे काही छायाचित्र  पोस्ट केले आहेत. तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा … आणि हो आमचा पुढील प्रोजेक्ट असणार आहे परी राणींचा बाग…




चप्पल  stand  ला हि नवीन colour दिला नवीन लूक साठी 


संपूर्ण व्हरांडा







  

My Balcony wall was our Art Victim (^_^)


गेल्या वर्षीची गोष्ट आहे, दिवाळीच्या वेळेला  आम्ही  आमच्या कुलदैवतांचे दर्शन करून यायचे ठरविले. पुण्याहून आमचा प्रवास सुरु झाला, आम्ही सोलापूर मार्गे आधी जमखंडी (आमच्या मूळ गावी) येथे  पोहोचलो, मग तिथे श्री क्षेत्र कालोळी बालाजीचे दर्शन घेऊन संध्याकाळी बदामीला पोहोचलो. आमचा प्रवास खूपच सुखद होता.
बदामीबद्दल सांगायचे झाले तर, ती ६व्या शतकातले  चालुक्यांची  राजधानी. हे पुरातन काळाचे कलात्मक आर्किटेक्चर प्रदर्शाविणारी जगप्रसिद्ध स्थळ आहे. आता मी ठरली एक कलाकार, मला ह्या सगळ्याचे खूप वेड आहे. मी तिथे खूप रमली. 
तिथून एक अर्धा तासाच्या अंतरावर बनशंकरी देवीचे देऊळ आहे. आम्ही बरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोहोचलो. देऊळ हजारो पणत्यांनी लखलखत होते, आणि ती जगतजननी बनशंकरी सौम्य चंद्रासारखी  दिसत होती. आम्ही तिचे दर्शन घेऊन धन्य झालो. अम्बज्ञ .
दुसर्या दिवशी आम्ही सकाळी ५.३० ला देवीच्या मंदिरात गेलो देवीला सहस्त्र तांब्यांनी न्हाऊ घातले मग जवळ जवळ ५० साड्या नेसवल्या. ते दृश्य अद्भूत होते अविस्मरणिय होते. महाप्रसाद घेऊन जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो तेव्हा थोडे वाईट वाटले. पुन्हा परत येऊ असे म्हणत पुण्याची वाट धरली.
परत जातांना पटदकल्लू नावाचे गाव आहे तिथे ६व्या शतकातले दगडावारचे कलाकृती आहेत, खूप सुंदर आहे हि जागा इत्थे एक दोन तास थांबून आम्ही पुण्याला परतलो. त्यचे काही फोटोस share केलेत. 
ह्या स्थळाचे वर्णन आम्हाला दैनिक प्रत्यक्ष वरून पण मिळाले -(http://www.ambadnya-pratyaksha.com/).

सर्वांनी एकदा तरी इथे जाऊन ही भारतातली आश्चर्यकारक जागा जरूर बघावी.
देवी बनशंकरी 

वरचे सिलिंग वर केलेली कारीगरी 



गाभार्याचे द्वार 








महाविष्णू चे वेगवेगळे अवतार, अप्रतिम नक्षीकाम!!


मुख्य प्रवेश द्वार 



MY Work - Sunrise Acyrilic on canvas

जीवनात भगवंत प्रत्येकाला असा एक क्षण देतो, जेंव्हा माणसाला वाटते की आपल्या जीवनात रडणे, किर किर, अडचणी ह्यां पल्लीकड़े त्या परमात्म्या ने बनविलेले एक सुंदर जग आहे, आणि ज्याने एवढे सुंदर निसर्ग बनविले त्याच्या हातात आपले आयुष्य दिले तर तो त्याचे किती सुंदर करणार। बास हा असाच एक क्षण brush आणि canvas वर उतरवण्याचा प्रयास


Oil on Canvas
24” x 36”
(Sold)

Murli is the name of this painting. I am a devotee of Shree Krishna, Once it occurred to me that though there was a tiff between Krishna’s two wives one was Rukmini and Satyabhama. Lord Krishna gifted the flowers to one and other one got angry… actually I do not know exactly the story, but while thinking this I thought His true companion was His flute, His Murli, in which He breathed and created mesmerizing music. Suddenly it occurred that before becoming the flute it was just a bamboo stick, it was chiseled and flute was made out of it. Lucky Murli, Lord Breaths through her and keeps her always near Him, I wish I was that Murli!!

काही दिवसांपूर्वी दैनिक प्रत्यक्ष ह्या वृत्तपत्रात एक लेख आले होते.  श्रीसाईसच्चरित ग्रंतातले आदरणीय श्री डॉ . विशाखावीरा जोशी  व डॉ . योगीन्द्रसिंह जोशीनी लिहिलेले हे लेख माझ्या ह्या painting ला अगदी बरोबर प्रस्तुत करते, त्यांच्या लेखातले काही lines :- माणसाने 'सान'  पण राखावे. उगाच नसत्या महान्पणाच्या फंद्यात पडू नये. बासरीला 'सानिका' असे महणतात . श्री कृष्णला  हि सानिका सर्वात प्रिय आहे, ती सत्तात त्याच्याजवळ आहे. ह्याचाच अर्थ हि भोळ्या भावाची निरहंकारी वर्र्ती सद्गुरुतात्वाला आवडते. साईनाथाना लागतो तो कच्चा घडा. एकदा गोपगोपिकांनी बासरी कृष्णाला का आवडते ह्याचे चिंतन केले. तेव्हा त्यांना उमगले कि हि बासरी 'सानिका' इवलीशी, साधीशी आहे. तिला न रंग न रूप. तिच्यात काहीही नाही. ती अगदी सरळ आहे. तिच्यात एकही गाठ नाही, एकही वळण नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ती पोकळ आहे म्हणजे तिच्यात अहंकार नाही. तिच्या अंगावर सहा भोकानमधून तिच्यातले षडरिपु कायमचे गेले आहेत. तिला स्वतःचा  आवाज नाही, तो भक्तसखा कृष्ण त्याला हवे तसे ध्वनी तिच्यातून काढतो. कृष्ण जसा बोलतो तशी हि बासरी बोलते आणि म्हणूनच हि अखंड कृष्णास प्रिय आहे, कृष्णाजवळ आहे.

अहंकारापासून मुक्ती कशी मिळवायची ह्यावर डॉ . योगीन्द्रसिंह जोशी आणि डॉ . विशाखावीरा जोशी ह्यांनी ५१ मुद्धे लिहिलेले आहेत. असे हे सुंदर विचारांचा लाभ प्रत्येकांनी जरूर घेतला पाहिजे, त्या साठी दैनिक प्रत्यक्ष अवश्य वाचा




 श्री राम • अम्बज्ञ 





This is a wall painting which I had made just for pass time in my office. 

The tear drop was accidental and so gives not so happy positive feel but it sure was intricate.