हाथी घोडा पालकी जय कनैहयालाल की


My Balcony wall was our Art Victim (^_^)


5 comments:

बदामी सफर...

गेल्या वर्षीची गोष्ट आहे, दिवाळीच्या वेळेला  आम्ही  आमच्या कुलदैवतांचे दर्शन करून यायचे ठरविले. पुण्याहून आमचा प्रवास सुरु झाला, आम्ही सोलापूर मार्गे आधी जमखंडी (आमच्या मूळ गावी) येथे  पोहोचलो, मग तिथे श्री क्षेत्र कालोळी बालाजीचे दर्शन घेऊन संध्याकाळी बदामीला पोहोचलो. आमचा प्रवास खूपच सुखद होता.
बदामीबद्दल सांगायचे झाले तर, ती ६व्या शतकातले  चालुक्यांची  राजधानी. हे पुरातन काळाचे कलात्मक आर्किटेक्चर प्रदर्शाविणारी जगप्रसिद्ध स्थळ आहे. आता मी ठरली एक कलाकार, मला ह्या सगळ्याचे खूप वेड आहे. मी तिथे खूप रमली. 
तिथून एक अर्धा तासाच्या अंतरावर बनशंकरी देवीचे देऊळ आहे. आम्ही बरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोहोचलो. देऊळ हजारो पणत्यांनी लखलखत होते, आणि ती जगतजननी बनशंकरी सौम्य चंद्रासारखी  दिसत होती. आम्ही तिचे दर्शन घेऊन धन्य झालो. अम्बज्ञ .
दुसर्या दिवशी आम्ही सकाळी ५.३० ला देवीच्या मंदिरात गेलो देवीला सहस्त्र तांब्यांनी न्हाऊ घातले मग जवळ जवळ ५० साड्या नेसवल्या. ते दृश्य अद्भूत होते अविस्मरणिय होते. महाप्रसाद घेऊन जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो तेव्हा थोडे वाईट वाटले. पुन्हा परत येऊ असे म्हणत पुण्याची वाट धरली.
परत जातांना पटदकल्लू नावाचे गाव आहे तिथे ६व्या शतकातले दगडावारचे कलाकृती आहेत, खूप सुंदर आहे हि जागा इत्थे एक दोन तास थांबून आम्ही पुण्याला परतलो. त्यचे काही फोटोस share केलेत. 
ह्या स्थळाचे वर्णन आम्हाला दैनिक प्रत्यक्ष वरून पण मिळाले -(http://www.ambadnya-pratyaksha.com/).

सर्वांनी एकदा तरी इथे जाऊन ही भारतातली आश्चर्यकारक जागा जरूर बघावी.
देवी बनशंकरी 

वरचे सिलिंग वर केलेली कारीगरी 



गाभार्याचे द्वार 








महाविष्णू चे वेगवेगळे अवतार, अप्रतिम नक्षीकाम!!


मुख्य प्रवेश द्वार 


2 comments: